सावंतवाडी : वाळके मास्तर व्यायाम शाळा आजी-माजी मित्रमंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ व रविवार २७ ऑगस्ट रोजी महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाळके मास्तर जयंतीनिमित्त या स्पर्धांच आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्ताने राजवाडा येथील सभागृहात ऐतिहासिक शिवकालीन वस्तूंच व मोडी लिपीतील पत्रांच प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचा शुभारंभ युवराज लखमराजेंच्या हस्ते करण्यात आला. वाळके मास्तर व्यायाम शाळा आजी-माजी मित्रमंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवार २७ ऑगस्ट रोजी महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आलय. या स्पर्धेतील विजेत्याला 25 हजार रुपये रोख आणि चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख 15 हजार आणि चषक तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाच हजार रुपये आणि बेस्ट फर्स्ट मॅन, बेस्ट लास्ट मॅन आणि उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. महिला विजेत्यांसाठी अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांक विजेता पाच हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे.
सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे या स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.यावेळी युवराज लखमराजे सावंत-भोंसले, अँड. बापू गवाणकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, कवी विठ्ठल कदम, कृष्णा राऊळ, आदी उपस्थित होते.