
सावंतवाडी : सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनच्यावतीने सावंतवाडी येथील भरत कॅरम अॅकडमी येथे ज्युनिअर खेळाडूंसाठी कॅरम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षक योगेश फणसळकर हे या शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना योगेश फणसळकर यांनी सांगितले की, जर इच्छुक खेळाडूंची संख्या वाढली तर रविवारी प्रशिक्षणासाठी जादा वेळ दिला जाईल. त्यामुळे अधिकाधिक ज्युनिअर खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
इच्छुक कॅरम खेळाडूंनी अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:भरत कॅरम अॅकडमी
मोबाईल नंबर: 9420646945
या उपक्रमामुळे सावंतवाडीतील कॅरम खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रवासात नक्कीच मोठा फायदा होईल, असे भरत सावंत यांनी म्हटले आहे.














