सिंधुदुर्गनगरी : दिनांक २३ जून २०२४ रोजी. डॉन बॉस्को हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ओरोस येथे जागतिक ऑलिंपिक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऑलिंपिक खेळाचे महत्त्व लक्षात घेता त्याचा प्रचार व प्रसार व्हावा , खेळाडूना योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रशालेमध्ये फुटबॉल खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रशालेचे जेष्ठ क्रीडा शिक्षक. श्री रोहिदास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
प्रशालेचे शिक्षक सर्वश्री सर जेसन, सर बॉंनी, सर श्रीकृष्ण सहशिक्षिका जुई शेर्लेकर व सहकारी शिक्षकांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तत्पूर्वी डॉन बॉस्को प्रशालेचे मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्पर्धेचे उद्घाटन केले व उपक्रमाचे खूप कौतुकही केले. या स्पर्धेत इयत्ता-नववी व दहावीच्या ४ संघांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.