कणकवली : ARM प्रो कबड्डी चा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. गेले दोन दिवस झालेल्या पुरुष गटातील कबड्डी स्पर्धेंची अंतिम फेरी व महिला कबड्डीचा थरार आज रंगणार असून नामांकित असे नऊ महिला संघ या प्रो कबड्डी मध्ये सहभाग घेणार आहेत.आज सायंकाळी सात वाजता कणकवली टेंबवाडी येथे अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने ARM प्रो कबड्डीचे शानदार नियोजन करण्यात आले आहे. आजच्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे हे देखील या प्रो कबड्डी साठी उपस्थित राहणार आहेत.
मागील दोन दिवस उत्कृष्ट रित्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या असून ह्या स्पर्धा बघण्यासाठी लोकांनी चांगली गर्दी होत आहे तसेच कोकसाद लाईव्हच्या युट्युब चॅनेलवर गेली दोन दिवस प्रेक्षक ही कबड्डी स्पर्धा ऑनलाईन पाहत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या महिला प्रो कबड्डी साठी देखील कबड्डी प्रेमींनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती ठेवावी, असे आवाहन अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.