चंदीगड : भारतीय कुस्ती संघटनेच्या च्या निवडणुकीमध्ये भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे विजय झाल्यानंतर सुवर्ण पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची मोठी घोषणा 21 डिसेंबर रोजी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली होती. अशातच आता विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी विनेश फोगाटने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, साक्षी मलिक हिने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनिया यानेही पद्मश्री परत केला आहे. देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करायला भाग पाडले गेले. संपूर्ण देशाला हे माहित आहे की, तुम्ही देशाचे प्रमुख आहात, त्यामुळे ही बाब मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मी तुमच्या घरची मुलगी आहे आणि गेल्या एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. यांना पत्र लिहित मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.