
वेंगुर्ले : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्र मंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक येस. एल. बिडिकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा सुजाता पडवळ, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, तालुका उपाध्यक्ष प्रितम सावंत, सचिन शेटये, भूषण सारंग, नामदेव सरमळकर, प्रमोद गोळम, राष्ट्रीय पंच अनिल जगदाळे आणि मोहन मालवणकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परूळकर यांनी केले. या भव्य स्पर्धेमुळे वेंगुर्ल्यातील तरुण खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावनेचा उत्कृष्ट संगम या स्पर्धेत अनुभवायला मिळाला. युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या प्रेरणेतून आयोजित झालेल्या या उपक्रमाने वेंगुर्ला तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे.