जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विजेता

Edited by: दिपेश परब
Published on: October 10, 2025 11:15 AM
views 80  views

वेंगुर्ले :  बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुले व मुले जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला संघ विजेता ठरला. विजेत्या संघांचे प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी मुलांना संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे खेळाडूंनी मेहनत करणे फार गरजेचे आहे असे संबोधित केले. प्रमुख पाहुणे सचिन वालावलकर यांनी मुलांना खेळात यश संपादन करताना आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्वल होईल असा खेळ करावा. स्पर्धेचे उद्घाटक संजू परब यांनी मुलांना मार्गदर्शन करताना मुलांनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न बघता आपले भविष्य घडविणारे करिअर म्हणून पहावे असे संबोधित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजू परब यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ  देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक राणे ,पर्यवेक्षक डी. जे. शितोळे , संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमुख डी. एस. पाटील  ,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, जिल्हा क्रीडा कार्यालय अधिकारी सचिन रणदिवे, लेफ्टनंट बी. जी. गायकवाड, तालुका समन्वयक संजय परब, दाभोली हायस्कूल मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, प्रितम सावंत, तालुका क्रीडा केंद्र प्रशिक्षक जयवंत चुडनाईक, संजीवनी चव्हाण, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, तुषार साळगावकर, मंगेश माने आदी उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक हेमंत गावडे यांनी, जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई यांनी आभार मानले. 

या स्पर्धेतील १९ वर्षाखाली मुले गटात सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेता बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला तर उपविजेता कुडाळ हायस्कूल कुडाळ, तर तृतीय आचिर्णे आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय वैभववाडी ठरला. १९ वर्षाखालील मुली गटात विजेता आचिर्णे आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय वैभववाडी तर उपविजेता कुडाळ हायस्कूल कुडाळ तर तृतीय बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला या संघानी बाजी मारली.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच अजित जगदाळे ,चारू वेंगुर्लेकर, हेमंत गावडे, सॅमसंग फर्नांडिस ,कौस्तुभ वांयगणकर , शिवराम नांदोसकर , निशांत, ओंकार गोसावी यांनी काम पाहिले. विजेत्या संघाचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर प्रेसिडेंट शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रोन कॉन्सिल मेम्बर दौलतराव देसाई, ऍडमिस्ट्रेटीव ऑफिसर पृथ्वी मोरे आदिनी अभिनंदन केले आहे.