कळणेच्या वल्लभ घोटगेला राज्यस्तरीय पंचगिरीची संधी

Edited by: संदीप देसाई
Published on: October 09, 2025 21:27 PM
views 413  views

सिंधुदुर्ग : वल्लभ घोटगे याने 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत यशस्वी होऊन पंच बनले. दोन वर्ष पंचगिरीची संधी न मिळावी यासाठी ते मेहनत घेत होते. अखेर सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या सहकार्याने 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी सोलापूर व सातारा येथे होणाऱ्या अंडर-15 मुलींच्या स्पर्धेत त्यांना पंचगिरी करण्याची संधी मिळाली आहे.

हे कळणे गावच्या सुपुत्र असलेल्या घोडगे याला अशी मोठी संधी मिळाल्याने कळणे वासिय तसेच दोडामार्ग तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ही निवड महत्वपूर्ण व अभिनंदनीय ठरली आहे.