
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचा 17 वर्षे वयोगटातील संघ उपविजेता ठरला.
अंतिम सामन्यात दमदार खेळ करून या संघाने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला. विजयी संघात वेदांत सुळे, नैतिक नलावडे, आर्यन शिर्के, शतांशु शिंदे, स्वराज चुनकीकर, समर सुर्वे, आर्यन शिर्के, सोहम टाकळे, समर्थ वाईल आणि शिवराम वाघे यांचा समावेश होता. संघाला क्रीडा शिक्षक समीर कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.