
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुली अंतिम सामन्यात विजयी ठरल्या.
संघातील विद्यार्थिनींमध्ये श्रीया हुंबरे, ईश्वरी महाडिक, वैष्णवी महाडिक, सैवी भोबसकर, श्रुती पोसनाक, श्रेया खाडे, पायल अहिरे, आर्या पालांडे, सलोनी वाटेकर, प्रज्ञा थोरवडे आणि इशा जड्याळ यांचा समावेश होता. संघाने नवभारत हायस्कूल खेडला तब्बल १५ गुणांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले.
या यशस्वी संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे. क्रीडा अधिकारी सुनिल कोळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तर क्रीडा प्रमुख समीर कालेकर आणि नितेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापक म्हणून सोळुंखे यांनी काम पाहिले. शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, तसेच पर्यवेक्षिका रेवती कारदगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.