
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या 14 वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात या संघाने न्यू इंग्लिश स्कूल, मुर्तवडेचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.
तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे हा संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघामध्ये स्मित जाधव, अर्णव इंगवले, समर्थ मोरे, वेदांत चिपळूणकर, रुद्र भुवड, हर्ष महाडीक, साईराज कुळे, आकाश खेडेकर आणि आर्यन बुरबांडकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघाला क्रीडा शिक्षक श्री. समीर कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक यांनी संघाचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.