
वेंगुर्ले : वेंगुर्ले-भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात प्रथम तीन क्रमांक पटकावीत तुळस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
शासनामार्फत आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर नगरपरिषदचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, अँड. नंदन वेंगुर्लेकर, माजी क्रीडा समन्वयक जयराम वायंगणकर, तालुका क्रीडा समन्वय समितीचे संजय परब आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेवेळी दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, मठ हायस्कूल मुख्याध्यापक सुनील जाधव, अणसुर-पाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ, परुळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रभु-पंचलिंग, वेतोरे हायस्कूलचे शिक्षक रविकांत कदम, वेंगुर्ले हायस्कूलचे शिक्षक श्री. केर्लेकर, रा. कृ. पाटकर हायस्कूलचे शिक्षक समीर पेडणेकर, तुळस हायस्कूलचे शिक्षक श्री. गोडे-पाटील, वेंगुर्ले तालुका क्रीडा केंद्रातील प्रशिक्षक जयवंत चुडनाईक, संजिवनी परब आदी उपस्थित्त होते. पंच म्हणून कौस्तुभ पेडणेकर, प्रदीप प्रभु, नागेश धारगळकर, राजू चव्हाण यांनी काम पाहिले. या स्पर्धेस मुलामुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम पाच क्रमांक) १४ वर्षाखालील मुलगे- रुद्र दिगंबर मोबारकर (एम. आर. देसाई स्कूल), सन्मित अजित साटेलकर (एम. आर. देसाई स्कूल), काशिनाथ संतोष तेंडोलकर (मठ हायस्कूल), सात्विक निसर्ग ओतारी (मदर तेरेसा स्कूल), वेदांत सावळाराम नाईक (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), १४ वर्षाखालील मुली संगीता प्रदीप माडये
(अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परूळे), स्वरा सहदेव माडये (अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परूळे), रिद्धी मनोज राजापूरकर (दाभोली हायस्कूल), वैष्णवी लक्ष्मीकांत कर्पे (शिरोडा हायस्कूल) आर्या गुरुप्रसाद प्रभु-खानोलकर (पाटकर हायस्कूल).
१७ वर्षाखालील मुलगे- विराज मनोजकुमार बेहेरे (वेंगुर्ला हायस्कूल), अनुष्क अमोल अडके (शिवाजी हायस्कूल तुळस), पलाश प्रवीण राजापुरकर (वेतोरे हायस्कूल), विठ्ठल प्रसाद कोरगांवकर (वेंगुर्ला हायस्कूल), रोहित नीळकंठ गडेकर (तुळस हायस्कूल). १७ वर्षाखालील मुली- संचाली संदीप तुळसकर, संस्कृती संजय तुळसकर, सोनल संदीप मराठे (तिन्ही तुळस हायस्कूल), अनुष्का मिलिंद राऊळ (परुळे हायस्कूल), आस्मला अजित परब (मठ हायस्कूल). १९ वर्षाखालील मुलगे - सौरभनागेश धारगळकर (वेतोरे हायस्कूल), साहील सुनील गावडे (बॅ. खर्डेकर ज्युनियर कॉलेज), अथर्व अभिजित सोन्सुरकर (अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा), गौरव हेमंत रेडकर (बावडेकर विद्यालय. शिरोडा), हर्ष सुभाष मेस्त्री (पाटकर हायस्कूल). १९ वर्षाखालील मुली- राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर (बॅ. खर्डेकर ज्युनियर कॉलेज), कशिश उदय कोनकर (वेतोरे ज्युनियर कॉलेज), मालविका सुरेंद्र वारंग (बॅ. खर्डेकर ज्युनियर. कॉलेज).