भारत-पाक सामन्याची तिकिटे 3 तासात विकली

54 हजाराचे तिकिट ब्लॅकमध्ये 1.25 लाख रुपयांना विकले, 28 ऑगस्टला दुबईत सामना
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 19, 2022 15:18 PM
views 276  views
हायलाइट
एक तिकीट 5,500 दिरहम (सुमारे 1.20 लाख रुपये) मध्ये विकले जात आहे
तिकिटाची वास्तविक किंमत 54 हजार रुपये आहे.
5,400 रुपयाचे सामान्य तिकीट 54 हजार रुपयांना मिळत आहे.

आशिया चषक स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची तिकिटे मिळविण्याची अनोखी शर्यत सुरू झाली आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

अवघ्या 3 तासात सर्व तिकिटे विकली गेली. मागणी एवढी होती की अनेक चाहत्यांना 5 लाखांहून अधिक ऑनलाइन प्रतीक्षा यादीत वाट पाहावी लागली.

दरम्यान, क्लासिफाइड वेबसाईट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे ब्लॅकमध्ये विकली जात आहेत. एक तिकीट 5,500 दिरहम (सुमारे 1.20 लाख रुपये) मध्ये विकले जात आहे, तर या तिकिटाची वास्तविक किंमत 54 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे 5,400 रुपयाचे सामान्य तिकीट 54 हजार रुपयांना मिळत आहे.

यावर आशिया कप तिकिट भागीदार 'प्लॅटिनम लिस्ट'ने सांगितले की, तिकिटांची अशी विक्री बेकायदेशीर आहे. लोकांनी हे लक्षात घ्यावे की स्टेडियममध्ये प्रवेश करताना, इतर कोणत्याही माध्यमातून खरेदी केलेली अशी तिकिटे अवैध घोषित केली जाऊ शकतात.

आयोजकांनी आता तिकीट विक्रीतही बदल केले आहेत. आता भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकिटे इतर सामन्यांच्या पॅकेजसह उपलब्ध असतील. शारजाहचे रहिवासी साद अहमद हे तिकीट मिळालेल्या भाग्यवानांपैकी एक आहेत.

ते म्हणतात- 'मी सकाळी 8 वाजता एकाच वेळी चार संगणकांवर वेबसाइट उघडली. 20 मिनिटांत तिकीट मिळाल्याने मी नशीबवान होतो.’ तर दुबईत राहणारे विशाल सिंग सांगतात की, ऑनलाइन रांगेत 4 तासांनंतर त्यांना फक्त एक प्रीमियम तिकीट मिळू शकले.

पहिल्या सामन्याची तिकिटे मिळवण्यात अपयशी ठरलेले अनेक चाहते अंतिम आणि सुपर-4 सामन्यांसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतातून येथे काम करण्यासाठी आलेला अमरदीप सिंग म्हणतो- 'मला आशा आहे की अंतिम फेरीत दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. त्यामुळे मला आतापासून तिकीट कन्फर्म करायचे आहे.