ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय

चिन्नास्वामीवर हिटमॅन शो
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 18, 2024 06:01 AM
views 70  views

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना चाहत्यांच्या आठवणीत राहणारा ठरला. या सामन्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर झाले. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केले. रवी बिश्नोई याने या षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघ जिंकला. दुसऱ्या सुपर ओव्हरवेळी भारताने 11 धावा करून दोन विकेट्स गमावल्या होत्या.

उभय संघांतील या सामन्यात 40 षटकांचा खेल पूर्ण झाल्यानंतर दोन्हीपैकी एक संघ जिंकणे अपेक्षित होते. पण या आपल्या डावातील 20 षटकांचा खेळ संपल्यानंतर अफगाणिस्तानने 212 धावा केल्या होत्या. परिणामी सामना निकाली लावण्यासाठी सुवर ओव्हर खेळवली गेली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघ 16 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने देखील 6 चेंडूंमध्ये 16 धावांपर्यंत मजल मारली आणि पुन्हा एकदा सामना टाय झाला. दुसऱ्यांदा सुपर ओव्हर सुरू झाली. भारतीय संघाने 5 षटकात 11 धावा केल्या आणि षटकातील आपली दुसरी विकेट गमावली. प्रत्युत्तारत अफगाणिस्तानला शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला.

शेवटच्या षटकात रवी बिश्नोईने अवघी एक धाव खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासाठी रवीचे कौतुक केले जात आहे. या सामन्यातील दोन सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा याने एकूण तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्याआधी रोहितने 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली होती.

अफगाणिस्तानला या सामन्यात विजयासाठी 20 षटकांमध्ये 213 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रहमानुल्ला गुरबाझ (50), इब्राहिम झद्रान (50) आणि गुरबदिन नाईब (55*) यांनी अर्धशतके ठोकली. मोहम्मद नबी यानेही 34 धावांचे योगदान दिले. पण हे फलंदाज आपल्या संघाला 20 षटकांमध्ये 213 धावांपर्यंत पोहोचवू शकले नाहीत. शेवटच्या चेंडूवर तीन धावा हव्या असताना गुलबदिन नाईब याने दोन धावा पळून काढल्या. परिणामी सामन्याचा निकाल सुपर ओव्हरकडे गेला. भारतासाठी वॉशिंगटन सुंदर याने सर्धिक 3 विकेट्स घेतल्या. यासाठी त्याने तीन षटके गोलंदाजी केली अशून 18 धावा खर्च केल्या.


भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी वादळी खेळी करत भारताला 4 विकेट्सच्या नुकसानावर 212 धावांपर्यंत पोहोचवले होते. रोहित शर्मा याने 69 चेंडूत 121* धावा केल्या. तर रिंकूने 39 चेंडूत 69* धावांची वादळी खेळी केली. त्याआधी भारतासाठी यशस्वी जयस्वाल 4, विराट कोहली 0, शिवम दुबे 1 आणि संजू सॅमसन 0 धावा करून बाद झाले. फरिद अहमद यायने 4 षटकात 20 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अजमतुल्ला ओमरझाई याने 1 विकेट घेतली.