
मालवण : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार, तनय लाड यांनी तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगला, बेंगलोरच्या पी वेण्याश्री यांनी वेगवान जलतरण पटूचा बहुमान मिळविला. आजच्या पहिल्या दिवशी विविध गटात सुमारे तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उदघाटन सकाळी राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी डॉ. तपन पानेगिरी, राष्ट्रपती अवार्ड राष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कृष्णा ढोलम, महेश कदम, राधिका परब, ज्योत्स्ना परब, डॉ. राहुल पंतवालावलकर, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, निल लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ यांसह अन्य आयोजक व मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- २ किलोमीटर फिन्स मुले- अनुक्रमे रणबीरसिंग गौर (नागपूर), आलोक जाधव (नाशिक), अथर्व भेडे (नागपूर), अक्षत सावंत (ठाणे), बाळकृष्ण येरम (मुंबई), स्मित सावला (नाशिक), सुहास काळे (नाशिक), श्रेयस पराडकर (रायगड), केतन कुलकर्णी (पुणे), आकाश कोटिया (गुजरात) २ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे- जान्हवी धामी (मुंबई), स्वराली वानखेडे (नाशिक), निधी बोरीकर (नागपूर), अरुंधती सोनाव (पुणे), समीक्षा वेरुळे (बीड), राजनंदिनी चाटे (बीड), राजेश्वरी गायकवाड (पुणे), शर्वरी हजारे (पुणे), पायल मोरे (नाशिक), वैदेही पोतदार (मुंबई)
१ किलोमीटर फिन्स मुले अनुक्रमे- ध्रुव धामणे (नाशिक), रुद्र मोरे (मुंबई), अरहान खान (नागपूर), श्रीदत्त पुजारी (बेळगाव), श्रीनिक भामबेरे (पुणे), परम वाघ (नाशिक), हर्षद जाधव (नाशिक), विराज पोमन (नाशिक), शिवंश पाटील (नाशिक), अर्जुन वाबळे (नाशिक) १ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे- अकिरा खोत (पालघर), वसुंधरा कसबे (नाशिक), मनस्वी सोनावणे (पुणे), साची बंदाबे (पुणे), प्राजक्ता सुर्वे (मुंबई), सायली घुग्रेतकर (बेळगाव), अद्या म्हात्रे (ठाणे), अनुभा सोरटे (नागपूर), संहिता करमरकर (सातारा), श्रावणी कुलकर्णी (पुणे)
१० किलोमीटर मुले अनुक्रमे- अश्विन कुमार (ठाणे), चैतन्य शिंदे (पुणे), वरद कुवर (नाशिक), रुद्र मानडे (कोल्हापूर), सागर कांबळे (पुणे), अनुज उगले (नाशिक), भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), पुष्कर शेळके (नाशिक), साईश मालवणकर (ठाणे), विश्वा शिंदीकर (नाशिक), १० किलोमीटर मुली अनुक्रमे- अनुजा उगले (नाशिक), मिहिका कोळंबेकर (मुंबई), स्वरा सावंत (ठाणे), चित्रानी नवले (सातारा), सुरभी शिंदे (मुंबई)
१० किलोमीटर गट दुसरा मुले अनुक्रमे- तनय लाड (ठाणे), श्लोक कोकणे (ठाणे), अबीर मांडवकर (ठाणे), प्रतुल्य झगडे (ठाणे), अबीर साळसकर (ठाणे), आरव आहुजा (ठाणे), निर्भय भारती (ठाणे), देव रजपूत (नंदुरबार), मयांक म्हात्रे (रायगड), दर्श बिलोरिया (ठाणे) मुली अनुक्रमे- पी वेण्याश्री (बेंगलोर), रेवा परब (ठाणे), हर्षदा चौधरी (ठाणे), गीतिशा भंडारे (ठाणे), प्रिशा वर्मा (ठाणे), अथश्री भोसले (ठाणे), विधी भोर (ठाणे), श्री शेट्टी (ठाणे), सई मुंडे (पुणे), स्पृहा उशिकर (ठाणे)
कनिष्ठ गट १ किलोमीटर मुली अनुक्रमे- आर्या हिरवे, समीप्ता वाव्हल, अस्मि चौधरी, मुलगे- रेयांश खामकर, राजवीर फरांदे, सिद्ध मुप्पीनेस्ती, मुली- विहा चौहान, साजिरी पाटील, मास्टर वो पुरुष- प्रदीप नासकर, आशिष रंजन, अक्षय पवार, २ किलोमीटर पुरुष- विरमनी मनोहरन, ज्ञानेश वानडे, खंतील दीक्षित, पुरुष- प्रसाद काजबजे, सुदेश पत्की, १ किलोमीटर पुरुष- शिरीष पत्की
कनिष्ठ गट २ किलोमीटर मुली- मेधस्वी परात्ने, मुलगे- उदित मलिक, लेना प्रनेश, मुलगे- रणबीरसिंग गौर, ध्रुव धामणे, निल पत्की, मुली- ओवी पवार, मुलगे- सुयश हिंदळेकर, सूर्या मंडल, त्रिग्या मुन, मुली- अस्मि हिरवे, शफझा शाहिद, ऐशी चक्रवर्ती, १ किलोमीटर मुलगे- बाळकृष्ण येरम, आरव भारद्वाज, शिवंश पाटील













