तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या संघाला विजेतेपद !

सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका हेशागोळ, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी केलं अभिनंदन
Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2022 14:58 PM
views 836  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मंगळवार  दि. २२ रोजी खेमराज विद्यालय, बांदा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील  विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले. प्रशालेचे विद्यार्थी कु. झोहेर बेग ( संघ कर्णधार ), कु. अब्दुललतिफ पटेल, कु. अकबरअली खान, कु. सफवान बांगी, कु. मोहम्मद फैज शेख, कु. अलियान मुंजावर, कु. मुस्तकीम सय्यद या  सर्वांनी व्हॉलीबॉल खेळात उत्कृष्ट क्रीडा कौशल्य वापरून तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तरावर धडक मारली.


विजेत्या  संघांला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . निर्मला हेशागोळ आणि क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले . पुढील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मालवण तालुक्यातील पोईप येथे होणार आहेत. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी,  प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .