
सावंतवाडी : पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी पोलीस ठाणे आवारात काही निमंत्रित संघांच्या हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पत्रकार, महसूल, पोलीस, नगरपरिषद, वनविभाग, स्थानिक संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये नगरपरिषद सावंतवाडी हा संघ विजेता तर महसूल विभाग सावंतवाडी हा संघ उपविजेता ठरला. विजेता व उपविजेता संघांना आकर्षक चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सावंतवाडी पोलिस उपस्थित होते













