मालवण : आस्था ग्रूप तर्फे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 3 सप्टेंबर रोजी 10 वाजता मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केली आहे. 17 वर्षाखालील मुलगे, मुली अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. ही कबड्डी स्पर्धा शालेय नियमानुसार होईल. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे उत्कृष्ट चढाई, पकड आणि अष्टपैलू खेळाडू यांनाही पारितोषिक देण्यात येतील.
इच्छुक संघानी आपली नावे सौगंधराज बादेकर यांच्याकडे द्यावीत. अधिक माहितीसाठी 9420022890 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.