सिंधुदुर्गच्या तायक्वांदोपटूंनी केली पदकांची कमाई !

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 10, 2024 08:16 AM
views 281  views

कणकवली : रत्नागिरी तेथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो पटूंनी 

विविध वजनी गटात ४ सुवर्ण , १ रौप्य , १० कांस्य पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत स्विझल डिसुझा (सुवर्णपदक), गणराज शिरवलकर (कांस्यपदक), देवश्री कणसे (सुवर्णपदक), स्पृहा राणे (सुवर्णपदक),मंजिरी सावंत ( कांस्यपदक), अवनी घाडीगावकर ( कांस्यपदक), अस्मी राऊळ (कांस्यपदक), श्रेयस पुजारे (कांस्यपदक), ऋणमय शिरवलकर (कांस्यपदक), रुतुजा शिरवलकर (कांस्यपदक), दुर्वा गावडे ( कांस्यपदक), रुजुता कुंभार (कांस्यपदक), साईराज पाटील (रौप्य पदक),

साईराज सावंत (कांस्यपदक),  दुर्वा पवार (सुवर्णपदक)या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. 

या यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, कणकवली तालुका हौशी तायक्वांदो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे,  प्रशिक्षक मंदार परब, अविराज खांडेकर, दिक्षा पारकर, पंच अंकुर जाधव, जान्हवी बाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.