
मंडणगड : महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन आयोजित 37 साव्या राज्य वरिष्ठ क्लोरुगी आणि अकरावी पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील स्वराज शिल्पा सुनील आईनकर याने 54 किलो वजनी गटाचा मानकरी त्यांची सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ठाणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
मंडणगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रोजी जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम कटक ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या तो वॉरियर तायक्वांदो अकॅडमी सानपाडा येथे प्रशिक्षण घेत असून मंगेश आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली तो राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे. संपूर्ण तालुका भरातून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून, त्याला राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी तालुकावासियांच्या शुभेच्छा मिळत आहेत त्याच्या या यशामध्ये मध्ये मंडणगड तालुका तायक्वांदो असोसिएशन यांचेही मोलाचे योगदान आहे.