तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांचं सुयश

Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 15:16 PM
views 322  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने घेतलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले आहे. त्यांना शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कु . आस्था अभिमन्यू लोंढे (१४ वर्षांखालील मुली) प्रथम क्रमांक, कु. निश्चय रविंद्र कुंभार (१४ वर्षांखालील मुलगे) - तृतीय क्रमांक,कु . अमुल्य अरुण घाडी (१७ वर्षांखालील मुलगे) - प्रथम क्रमांक,कु. भावेश विजय कुडतरकर (१७ वर्षांखालील मुलगे) -चौथा क्रमांक, कु. राम प्रकाश फाले (१९ वर्षांखालील मुलगे) - प्रथम क्रमांक यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या सर्व खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.सर्व खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालधाना यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.