
सावंतवाडी : गुरुवर्य बी.एस. नाईक मेमोरिअल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे आयोजित या स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता आठवीतील गणेश विशाल परब तर इयत्ता सातवीतील पियुष संजय परब या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या विद्यार्थ्यांना कॅरम प्रशिक्षक अश्फाक शेख तसेच क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.














