शालेय फुटबॉल स्पर्धेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचं यश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:13 PM
views 99  views

सावंतवाडी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि क्रिडा उपसंचलनालय,कोल्हापूर विभाग यांच्यावतीने आयोजित विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संघाने तृतीय क्रमांक पटकवत दैदीप्यमान यश संपादन केले.

डेरवण क्रिडा संकुल, चिपळूण येथे २७\०९\२०२४ रोजी आयोजित विभाग स्तरावरील शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटात सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूल सातारा विरुद्ध १-० गोल नोंदवत प्रथम सामना जिंकला.सेमी फायनल फेरीत सैनिक स्कूल संघाचा सामना कोल्हापूर जिल्हा संघाविरुद्ध झाला. तृतीय क्रमांकासाठी सांगली संघाविरुद्ध ३-० गोल नोंदवत विजय मिळवला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करताना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाने विभाग स्तरावरील बलाढ्य संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट खेळ करणार्‍या दोन खेळाडूंची निवड राज्य स्तरीय संघात होणार आहे.

विजेता संघ व क्रिडाशिक्षक मनोज देसाई, सतिश आईर यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ. संचालक जाॅय डांटस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन.डी.गावडे, सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आहे.