सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे येथे भगीरथ मैदानावरती १७ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नेमळे विद्यालयाच्याच्या विद्यार्थीनींनी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच १४ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नेमळे विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही संघाची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ, प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी यशप्राप्त संघाचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आर. के. राठोड यांचे अभिनंदन केले.
१७ वर्षे वयोगटातील विजयी संघात प्राची आर्या कापडी, रिया जाधव, स्नेहा मुंडये, पायल वेंगुर्लेकर, भाग्यश्री पांगम, निधी धुरी, श्रावणी नाईक,
श्रध्दा राऊळ, अर्पिता राऊळ, गेयता वेंगुर्लेकर, अनुजा योगके, निमिषा भुरी. तसेच १४ वर्षे वयोगटातील विजयी संघात वृषाली नागवेकर, तनिषा आंबेरकर, स्नेहा राऊळ, यशिता रेडकर, जान्हवी राऊत, सानवी राऊळ, प्रांजली गावडे, केतकी धुरी, पूर्वा लाड, कृतिका नाईक, श्रुती नेमळेकर, काजल हळदणकर, श्रेया धर्णे, श्रेया मांजरेकर, चेतना गुडेकर.