कणकवली : जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत आदित्य अच्युत वणवे (प्रथम) व ऋतुज कमलेश गोसावी (द्वितीय) क्रमांक मिळविला. दोन्ही विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे, सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शि.प्र.मं. कणकवलीचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी विजयकुमार वळंजू, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.