सावंतवाडी : डेरवण, चिपळूण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे गेली दहा वर्षे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मुक्ताई अकॅडमीचे विद्यार्थी, विदयार्थिनी मागील सात वर्षे या स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतात.
यावर्षी देखील सात विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवत खेळाचा आनंद लुटला. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दहा वर्षे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत आहेत. मुक्ताई ॲकेडमी राज्यस्तरावर 'बेस्ट अकॅडमी' पुरस्कार मिळवणारी कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे.
पारितोषिकप्राप्त विदयार्थी खुला गटात सातवा क्रमांक, जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा शालेय खेळाडू विभव राऊळ, दहावा क्रमांक यथार्थ डांगी, अनरेटेड गटात तिसरा क्रमांक - पार्थ गावकर, बारा वर्षांखालील गट पहिला क्रमांक - चिदानंद रेडकर, दुसरा क्रमांक - यश सावंत, तिसरा क्रमांक - रुद्र मोबारकर यांनी तर नऊ वर्षांखालील गट पहिला क्रमांक - चैतन्य सावंत यांनी प्राप्त केला.