सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषदेने आयोजित केलेल्या ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कौशल्य आणि प्रशंसनीय कामगिरीचे प्रभावी प्रदर्शन करून स्टेपिंग स्टोन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विशिष्ट स्थान पटकाविले.
इयत्ता सहावी मधील अस्मी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला, वैष्णव सावंत याने तृतीय क्रमांकाचे स्थान पटकाविले. रिचर्ड राॅड्रिग्ज आणि स्पृहा आरोंदेकर यांनी चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. तर सायना अळवणी ही पाचव्या क्रमांकाने विजयी झाली. त्याचप्रमाणे, या सर्वच विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धकांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर व संस्थापक रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.