सावंतवाडी : महाराष्ट्र क्रिकेट असो. आयोजित निमंत्रित साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १८ वर्षाखाली मुलांची लेदर बॉल क्रिकेट संघ निवड करण्यासाठी सावंतवाडी जिमखाना मैदानावर निवड चाचणी स्पर्धा शुक्रवार दि २० जानेवारी 23 रोजी सकाळी ९.३० वा. आहे. ०१/०९/२००४ नंतर जन्मलेल्या व जिल्हात रहिवास असलेल्या मुलांना निवड चाचणीत सहभागी होता येईल. तरी जिल्हात रहिवासी असलेल्या खेळाडुंनी पूर्ण गणवेशात रहिवासी दाखला व जन्म दाखला येताना सोबत आणावा, जिल्हातील जास्तीत-जास्त खेळाडुनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहसचिव काशिनाथ दुभाषी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रघुनाथ धारणकर मो.क्र. ९८९०८०२०९५ यांच्याशी संपर्क करावा.