SPORTS | सृष्टी राणे स्ट्राँग वुमन ऑफ सिंधुदुर्ग | स्ट्राँग मॅन ऑफ सिंधुदुर्ग बाळकृष्ण परब !

वायंगणकर व्यायामशाळा प्रस्तुत भव्य जिल्हास्तरीय पॉवर लिप्टींग स्पर्धा 2023
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 11, 2023 11:13 AM
views 403  views

देवगड : वायंगणकर व्यायामशाळा प्रस्तुत भव्य जिल्हास्तरीय पॉवर लिप्टींग स्पर्धा 2023 मध्ये महिला स्ट्राँग मॅन सिंधुदुर्ग सृष्टी राणे देवगड तर सिंधुदुर्ग स्ट्राँग मॅन पुरुष गटामधून बाळकृष्ण परब वेंगुर्ला यांनी किताब मिळविला आहे. 


वायंगणकर व्यायामशाळा प्रस्तुत भव्य जिल्हास्तरीय पॉवर लिप्टींग स्पर्धा 2023 चे आयोजन सांस्कृतिक भवन जामसंडे हॉल येथे संपन्न झाल्या.  यावेळी जिल्हयातील एकुण 61 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उदयोजक महेश घारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले आहे.


या उदघाटन प्रसंगी भाजपा युवानेते वैभव करंगुटकर , लवेकर, उध्दव गोरे, सुरेश कदम, एसआर फिटनेस तसेच सर्पमित्र जाधव सर, जिमचे प्रोप्रा. रामचंद्र वायंगणकर, सारंग, संजय साटम, बाळू पेडणेकर, सखाराम सावंत, संकेत ब्रीद, अमित कदम,प्यूचर फिट जिमचे दुर्गेश गावकर, योगेश राणे,शशांक साटम,विनोद चौघुले, स्पर्धेचे प्रायोजक प्रथमेश भडसाळे, अनिरुध्द ,हॉटेल प्रपंचचे मालक भावे, हॉटेल वसंत विजयचे मालक बाळासाहेब कोळंबकर, अर्जुन तळगावकर, गौरव स्पोर्टसचे चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेसाठी जिल्हयातून चांगला प्रतिसाद स्पर्धकांकडून मिळाला. वेगवेगळया वजनी गटामध्ये भाग घेवून उदघाटन प्रसंगी उदयोजक घारे , वैभव करंगुटकर, संजय साटम व जाधव सर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संजय साटम यांना पोलिस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याने राष्ट्रपती पदक मिळाल्याबददल त्यांचा देखील यावेळी सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 



स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

ज्युनियर मुलांमधून 53 किलो वजनी गटामध्ये प्रथम आदित्य पालव (वेंगुर्ला), व्दितीय तेजस तेली (जामसंडे), तृतीय चैतन्य निगरे (कणकवली), 59 किलो वजनी गटामध्ये प्रथ्म क्रमांक साहिल मोर्ये (जामसंडे),व्दितीय लक्ष्मण दळवी (वेंगुर्ला), तृतीय तोहीत सोलकर (देवगड),66 किलो वजनी गटामध्ये प्रथम बाळकृष्ण परब (वेंगुर्ला), व्दितीय प्रबुध्दराज नाईक (वेंगुर्ला), तृतीय प्रथमेश पराडकर (देवगड), 74 किलो वजनी गटामध्ये प्रथम  गौरांग गायकवाड (कणकवली), व्दितीय दिप जाधव (देवगड),अंकुश सिंग (सावंतवाडी), 83 किलो वजनी गटामध्ये प्रथम ऋषिकेश तेली (जामसंडे), व्दितीय सोहम परब (वेंगुर्ला), 93 किलो वजनी गटामध्ये प्रथम समर्थ भावे (जामसंडे), 120 किलो वजनी गटामध्ये प्रथम आदित्य कदम (देवगड) 

मास्टर पुरुष 

59 किलो वजनी गटामध्ये प्रथम गोविंद कळंबटे (जामसंडे), 74 किलो वजनी गटामध्ये प्रथम विनोद चौगुले (जामसंडे), 83 किलो वजनी गटामध्ये प्रथम प्रदिप नारकर (जामसंडे),66 किलो वजनी गटामध्ये प्रथम सुरेश कदम (देवगड) 

ज्युनियर मुलींच्या गटामधून 69 किलो वजनी गटामध्ये प्रथम पुनम विश्वकर्मा (जामसंडे), 57 किलो वजनी गटामध्ये प्रथम नेहा लाड ( जामसंडे), 

सिनिअर मुलींच्यागटामधून 52 किलो वजनी गटामध्ये प्रथम सृष्टी राणे (जामसंडे), 57 किलो वजनी गटामध्ये प्रथम नेहा लाड(जामसंडे), 84 किलो वजनी गटामध्ये प्रथम ज्योती कांबळे (ओरोस)

सब ज्युनिअर मुलींच्यागटामधून 47 किलो वजनी गटामध्ये प्रथम पुर्वा मलिक (सावंतवाडी), 52 किलो वजनी गटामध्ये प्रथम सायली सावंत (सावंतवाडी)57 किलो वजनी गटामध्ये प्रथम गूंजन बहादूर (सावंतवाडी), 63 किलो वजनी गटामध्ये प्रथम प्रसन्ना परब ( सावंतवाडी), 69 किलो वजनी गटामध्ये प्रथम यशश्री परब (जामसंडे), 76 किलो वजनी गटामध्ये प्रथम हर्षदा ठाकर (सावंतवाडी) 

सबज्युनियर मुलांच्यागटामधून 53 किलो वजनी गटामध्ये प्रथम आराध्य चौगुले (जामसंडे),व्दितीय वैभव वरक (सावंतवाडी) 59 किलो वजनी गटामध्ये प्रथम अलोक चव्हाण(कणकवली), व्दितीय क्रमांक सुयश चांदोस्कर, तृतीय सुरेश नाडणकर (जामसंडे), 66 किलो वजनी गटामध्ये प्रथम पृथ्वीराज राठोर (तरेळे), व्दितीय निलेश सावंत (सावंतवाडी), तृतीय गतिक परब (जामसंडे), 83 किलो वजनी गटामध्ये प्रथम अमित माळवदे (तळेबाजार),व्दितीय तौसीफ शेख (जामसंडे), तृतीय लोकेश गावडे (सावंतवाडी) 105 किलो वजनी गटामध्ये प्रथम हर्ष सावंत (फोंडा), 

सिनिअर मुलांमधून 66 किलो वजनी गटामध्ये प्रथम सुरेश कदम, व्दितीय प्रणित धुमडे(आचरा),  74 किलो वजनी गटामध्ये प्रथम रामचंद्र केसरकर (आचरा), 83 किलो वजनी गटामध्ये प्रथम ऋषिकेश तेली (जामसंडे), व्दितीय सुमित बाणे (ओरोस), 93 किलो वजनी गटामध्ये प्रथम ओंकार कुबडे( जामसंडे), व्दितीय तुषार चव्हाण (शिरगांव), 105 किलो वजनी गटामध्ये प्रथम रोहीत चव्हाण (मालवण), व्दितीय हर्ष सावंत (फोंडा), 120 किलो वजनी गटामध्ये प्रथम संकेत ब्रिद (ओरोस) यांनी मिळविला.वरील प्रमाणे स्पर्धकांनी यश संपादन केले असून दिवसभर चालणा-या या स्पर्धेमध्ये प्रदर्शन करण्यात आले.