कुडाळ : नवचैतन्य कला क्रीडा मंडळ कालेली पडकिलवाडी आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दत्तप्रसाद आडेली संघाने पटकावले. तर ब्राह्मण 7 वझराट उपविजेता ठरला.
स्पर्धा उद्घाटन व पारितोषिक समारंभ विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला. युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत, कालेली सरपंच आरोही प्रशांत चव्हाण, उपसरपंच सुधाकर पडकील, माजी सरपंच विद्यमान सदस्य सानिका सचिन परब, सदस्य विजय चव्हाण, विवेक परब, पोलीस पाटील सोनू चव्हाण, लक्ष्मण पडकील, तळेकर गुरुजी, समीर केरकर, महादेव कालेलकर, रमेश कदम, दीपक वारंग, महेश कालेलकर, शरद राऊळ, सुरेश कदम, न्हानू देसाई, काका मेस्त्री, पपु वारंग यासह नवचैतन्य कला क्रीडा मंडळ कालेली पडकीलवाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
विजेत्या दत्तप्रसाद आडेली संघास (11,1111/-) चषक, उपविजेत्या ब्राम्हण 7 वझराट संघास (6,666/-) चषक यासह सुरज, समीर सावंत, धनंजय राणे, गौरेश नाईक यांना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली. दत्तप्रसाद आडेली संघास शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले. पंच म्हणून विकास महाडेश्वर मांडखोल, कॉमेंट्री शाहरुख खान सावंतवाडी यांनी काम पाहिले. स्पर्धेदरम्यान कै. सागर परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.