देवगड : एन. एस. पंतवालावलकर ज्यू. कॉलेजच्या सौरव दुखंडेची हिंगणघाट, वर्धा इथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देवगड एन. एस. पंतवालावलकर ज्यू. कॉलेजच्या टीमने जिल्हा स्तरीय स्पर्धेत कुडाळ कॉलेजच्या टीमला अंतिम सामन्यात पराभूत करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी आणि सांगली कॉलेजचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात कोल्हापूर कॉलेज कडून पराभव पत्करावा लागला. परंतु अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे देवगड एन.एस.पंतवालावलकर ज्यू. कॉलेजच्या सौरव दुखंडेची मात्र राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सौरव हा देवगड एन. एस.पंतवालावलकर ज्यू. कॉलेज 12 वी विज्ञान शाखेचा शिकत असून क्रिकेटपटू तसेच भाकरवाडी युवक क्लब तळवडेचे अध्यक्ष प्रसाद दुखंडे यांचा सुपुत्र आहे. पू. प्रा. केंद्र शाळा तळवडे नंबर.१ चा माजी विद्यार्थी आहे. कु. सौरव प्रसाद दुखंडे याची 19 वर्षाखालील राज्य स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तळवडे या गावासाठी ही एक अभिमानास्पद बाबा आहे. या स्पर्धेसाठी सौरव ला क्रीडा शिक्षक शहाजी गोफने सर आणि उप प्राचार्य शेट्ये सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.पुढील स्पर्धा 12 डिसेंबर 2024 रोजी हिंगणघाट जि. वर्धा इथे होणार आहे.