
सावंतवाडी : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहाव्या कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणे हिने १२ व १८ वर्षांखालील मुली या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले तर सावंतवाडीच्या भारत सावंतने १४ वर्षांखालील मुले विजेता व १८ वर्षाखालील मुले उपविजेता असे दुहेरी यश मिळविले.
सावंतवाडीच्याच अमूल्य घाडीने अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. देवगडच्या मिहीर कार्लेकरने पहिल्यांदाच असोसिएशनच्या अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना १२ वर्षांखालील मुलांच्या वयोगटामध्ये विजेतेपद पटकावले. १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटामध्ये सावंतवाडीची आरजू शेख विजेती ठरली तर २१ वर्षाखालील मुलांच्या वयोगटामध्ये सावंतवाडीच्या देवांग मल्हार व २१ वर्षाखालील मुलींच्या वयोगटामध्ये सावंतवाडीचीच केशर निर्गुण पुन्हा एकदा विजेती ठरली.
रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी भारत कॅरम अकॅडमी, सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनची सहावी कनिष्ठ गट अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सुमारे 60 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेनऊ वाजता सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे श्री. दिलीप वाडकर, श्री. अशपाक शेख, श्री. राजेश निर्गुण, श्री. सचिन घाडी व भारत कॅरम अकॅडमीचे मालक श्री. विश्वनाथ सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. अत्यंत उत्साही वातावरणात उपस्थित खेळाडूंनी आपल्या नैपुण्याचे प्रदर्शन केले. शेवटी उपान्त्य व अंतिम सामने तसेच राज्य स्पर्धेच्या प्रवेशासाठीचे अतिरिक्त सामने अत्यंत उत्कंठावर्धक झाले.
स्पर्धेचे विस्तृत निकाल पुढीलप्रमाणे
१२ वर्षाखालील मुले : प्रथम मिहीर कार्लेकर, देवगड द्वितीय मिहीर बांदेकर, सावंतवाडी.
१२ वर्षांखालील मुली : विजेती दिव्या राणे, कणकवली द्वितीय तनुश्री महाडिक, कणकवली.
१४ वर्षाखालील मुले : विजेता भारत सावंत, सावंतवाडी २. पियुष परब, सावंतवाडी ३. गंधार नार्वेकर, सावंतवाडी ४. गणेश परब, सावंतवाडी ५.दुर्वांक मेस्त्री, कणकवली ६.देवांग मयेकर, कणकवली ७.आर्यन दळवी, सावंतवाडी ८.खुशाल नेमळेकर, कणकवली
१४ वर्षांखालील मुली : विजेती आरजू शेख, सावंतवाडी द्वितीय मीरा आपटे, कणकवली
१८ वर्षाखालील मुले : विजेता अमूल्य घाडी, सावंतवाडी २.भारत सावंत, सावंतवाडी ३.स्वप्निल लाखे, सावंतवाडी ४.भावेश कुडतरकर, सावंतवाडी ५. शार्दुल भोगटे, कुडाळ ६.सुधांशू धुरी, कुडाळ ७.ऑस्टीन डिसूझा, कणकवली ८.यशराज गवंडे सावंतवाडी
१८ वर्षाखालील मुली : विजेती दिव्या राणे, कणकवली २.आस्था लोंढे, सावंतवाडी ३.साक्षी रामदुरकर, सावंतवाडी ४.मुक्ती भातकांडे, कणकवली ५.श्रेया महाडिक, कणकवली ६.कृपा पेडणेकर, कणकवली ७. मीरा आपटे, कणकवली, ८.आरजू शेख, सावंतवाडी.
२१ वर्षाखालील मुले : देवांग मल्हार सावंतवाडी.
२१ वर्षाखालील मुली : विजेती केशर निर्गुण, सावंतवाडी २. दिक्षा चव्हाण, कणकवली ३.मयुरी गावडे, सावंतवाडी.