सावंतवाडी : संजू परब मित्र मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा जूदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जूदो स्पर्धेचे आयोजन 27 नोव्हेंबरला आर पी डी हायस्कूल मैदान सावंतवाडी येथे पार पडले.
या स्पर्धेत एकूण 273 खेळाडूंनी सहभाग घेतला उत्कृष्ट जूदो खेळाचे प्रदर्शन करत खेळाडूंनी 63 सुवर्णपदक 63 रोपे पदक तसेच 126 खेळाडूंनी कास्य पदक मिळवली.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा जूदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडीचा विद्यार्थी कुमार तेजसराव दळवी याला बेस्ट जुडोपटू पुरुष आणि करूळ फोंडा संस्थेची विद्यार्थिनी कुमारी तनवी पारकर हिला बेस्ट जुडोपटू महिला म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य जूदो असोसिएशन कासारडे यांना जनरल चॅम्पियनशिप देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वसंरक्षणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पालक वर्गातून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. संदेश पंडित, योगेश बेळगावकर, स्वप्नाली मॅडम व ॲड. पूजा दिनेश जाधव मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे प्रात्यक्षिक सादर करून स्पर्धेची सुरुवात केली.
सिंधुदुर्ग जिल्हा जूदो कराटे आकीदो असोसिएशनचे संस्थापक वसंत जाधव सर (सेन्सॉय) यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील जुडो खेळाडूंना व्यासपीठ मिळावा म्हणून स्पर्धांचे आयोजन केले. होते कोविड काळात मुलं खेळापासून दूर गेलेली पुन्हा स्पर्धा मध्ये यावीत म्हणून आयोजित केलेला भव्य जिल्हास्तरीय जुडो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजू परब माजी नगराध्यक्ष सावंतवाडी यांनी संस्थेला, संस्थेतील प्रशिक्षक ,खेळाडू तसेच संस्थेची जोडलेल्या सर्व पालक वर्गाला शुभेच्छा दिल्या.