जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 04, 2023 16:04 PM
views 125  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात काव्य दळवी, मुलींच्या गटात तनिष्का सावंत, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात मिहिर मयेकर, मुलींच्या गटात श्रद्धा तेली, १९ वर्षाखालील मुलांच्या गटात चैतन्य लोट, मुलींच्या गटात सृष्टी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस सिंधुदुर्गनगरी सचिव शांताराम रावराणे, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसचे प्रशासकीय अधिकारी अब्दुल शेख, सिंधुदूर्ग जिल्हा स्क्वॉश असोसिएशनचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे आदी उपस्थित होते. 

१४ वर्षांखालील मुले वयोगटात कु. काव्य दळवी (शिवाजी इंग्लिश स्कूल,पणदूर) याने प्रथम क्रमांक मिळविला. कु. विर कल्याणकर (कासार्डे मा. उ. वि.कासार्डे) याला द्वितीय क्रमांक, कु. श्रीकृष्ण भोई (शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर) याला तृतीय क्रमांक, कु. प्रणव खरवते (भ.ता.चव्हाण महा. चौके) याला चतुर्थ क्रमांक तर कू . पार्थ कल्याणकर (कासार्डे मा. उ. वि.कासार्डे) याने पाचवा क्रमांक  प्राप्त केला. तर मुली वयोगटात  कु. तनिष्का संदीप सावंत (बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली) हिने प्रथम क्रमांक पटकावला. कु. आरियन गुप्ता (डॉन बॉस्को, ओरोस) हिने द्वितीय क्रमांक, कु. किमया चव्हाण (भ.ता.चव्हान महा. चौके) हिने तृतीय क्रमांक, कु. मृणाली कासार (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस), हीने चतुर्थ क्रमांक तर कु. चैत्राली दळवी (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस) हीने  पाचवा क्रमांक प्राप्त केला.

१७ वर्षांखालील मुली वयोगटात कु. श्रद्धा तेली (कासार्डे मा. उ. वि.कासार्डे )हिने प्रथम क्रमांक , कु. प्रणाली ठोंबरे (बालशिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली) हीने व्दितीय क्रमांक, कु. सृष्टी राणे (बालशिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली) हीने तृतीय क्रमांक, कु. मधूरीमा माठेकर (बालशिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली) हीने चतुर्थ क्रमांक तर कु. रितिका खपेकर (बालशिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली) हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षांखालील मुले  वयोगटात कु. मिहिर मयेकर (डॉन बॉस्को, ओरोस) याने प्रथम क्रमांक, कु.मित मुळये (डॉन बॉस्को, ओरोस) याने द्वितीय क्रमांक, कु.नितेश गुप्ता (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस) याने तृतीय क्रमांक, कु. भावेश सावंत (डॉन बॉस्को, ओरोस) याला चतुर्थ क्रमांक तर कु. यज्ञेश राणे (डॉन बॉस्को, ओरोस) याला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.

१९ वर्षांखालील मुली या वयोगटात कु. सृष्टी खानोलकर (कासार्डे मा. उ. वि.कासार्डे) हिला प्रथम क्रमांक व कु. कस्तुरी मुंडले (कासार्डे मा. उ. वि.कासार्डे) हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. १९ वर्षांखालील मुले या वयोगटात प्रथम क्रमांक कु. चैतन्य लोट (डॉन बॉस्को, ओरोस) याला प्राप्त झाला. व्दितीय क्रमांक कु. पार्थ मालवणकर (डॉन बॉस्को ओरोस), तृतीय क्रमांक कु. वेदांग दळवी (डॉन बॉस्को ओरोस), चतुर्थ क्रमांक कु. अमेय राणे (डॉन बॉस्को ओरोस), तर पाचवा क्रमांक कु. समीर जाधव (शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पणदूर) ह्याने प्राप्त केला. या सर्व खेळाडूंची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेसाठी पंच म्हणून बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीच्या शिक्षिका जिशीना नायर, डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोसच्या शिक्षिका चित्राक्षा मुळये, सिंधुदुर्ग जिल्ह्याची राष्ट्रीय स्क्वॉश खेळाडू तन्मयी भगत, मृणाल मलये, दिव्यकांत वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. डॉन बॉस्को ओरोसच्या खेळाडूंनी जनरल चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल डॉन बॉस्को सिंधुदुर्गनगरीच्या शिक्षिका चित्राक्षा मुळये  यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.