अस्मिता लीग टॅलेंट सर्चला मुलींचा उत्स्फूर्त सहभाग

161 प्रतिभावान खेळाडूंची चमकदार कामगिरी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 03, 2025 13:08 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक असोसिएशन, अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया, भारत सरकार व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता लीग – मुलींची टॅलेंट सर्च मोहीम ओरोस क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील १६१ मुलींनी सहभाग नोंदवत या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक राजगुरू कोचले यांच्या हस्ते पार पडले. असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


स्पर्धेत महिमा विशाल मोहिते हिने ट्रायथलॉन ‘C’ गटात 60 मी., 600 मी. धावणे आणि लांब उडी या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत तिहेरी मुकुट आपल्या नावावर केला.


निकाल संक्षेप

ट्रायथलॉन – १४ वर्षाखालील मुली


A गट : रेवती फाटक – प्रथम


B गट : देवश्री कणसे – प्रथम


C गट : महिमा मोहिते – प्रथम


किड्स जॅव्हलिन

अस्मि धीरज सावंत – 14.40 मी. – प्रथम


16 वर्षाखालील – धावणे


60 मीटर : रिया मोहिते – प्रथम


600 मीटर : आकांक्षा कुंभार – प्रथम


फेक प्रकार

थाळी फेक : उर्वशी शेर्लेकर – 15.83 मी.


गोळाफेक : आर्या गावडे – 7.37 मी.


भालाफेक : उर्वशी शेर्लेकर – 14.55 मी.

उड्या

लांब उडी : वनिता निकम – 3.41 मी.


उंच उडी : आर्या सावंत – 1.10 मी.