
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभाग बॅडमिंटन (मुले व मुली) स्पर्धा दिनांक 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.
यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने रौप्य पदक व मुलींच्या संघाने कास्य पदक पटकावले. यशस्वी खेळाडूंमध्ये आदित्य सोनटक्के, प्रतीक मडगावकर, रुद्र वेंगुर्लेकर, जाॅय राॅड्र्यिक्स, शुभम देसाई, जयराम गोडकर, विश्वास पाटील तर मुलींमधून तनाज शहा, एलवीरा राॅड्र्यिक्स, प्राची वर्मा, रुही पावसकर ,सिया मेस्त्री यांचा विजयी संघामध्ये सहभाग होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले ,संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, क्रीडा संचालक सी.ए. नाईक उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले चेअरमन शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालय प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.