पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 9 धावांनी विजय

संजू सॅमसनची एकाकी झुंज
Edited by: अर्जुन धस्के
Published on: October 07, 2022 11:12 AM
views 206  views

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना लखनऊ येथे खेळला गेला. पावसामुळे प्रत्येकी 40  षटकांच्या केलेल्या या सामन्यात प्रेक्षकांना रंगतदार सामन्याची मेजवानी मिळाली. विजयासाठी मिळालेल्या 250 धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व संजू सॅमसन यांनी संघर्ष केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी करत सामना 9 धावांनी आपल्या नावे केला.

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. ऐडन मार्करम खातेही न खोलता तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने सलामीवीर डी कॉक याने डाव सावरून धरला होता. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने 54 चेंडूवर 48 धावांची खेळी केली. डी कॉक बाद झाल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी दाबाची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत 64 चेंडूवर 6 चौकार व 2 षटकारांसह 74 धावा केल्या. तर बाजूने क्लासेननेही तशाच प्रकारची फलंदाजी करताना 65 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा कुटल्या. भारतासाठी शार्दुल ठाकूरने दोन तर, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.


दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 250 भावांचा पाठलाग करण्यासाठी भारतातर्फे कर्णधार शिखर धवन व शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यांनी अनुक्रमे 4 व 3 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड यांनी संघर्ष केला मात्र त्यांच्या खेळ्या 19 व 20 धावांच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा जबाबदारीने खेळ करत संघाला संकटातून बाहेर काढले. एक महत्त्वपूर्ण व आक्रमक अर्धशतक करून तो बाद झाला.

श्रेयस बाद झाला तेव्हा भारताताला विजयासाठी 142 धावांची गरज होती. विश्वचषक संघ स्थान मिळालेल्या संजू सॅमसनने त्यानंतर शार्दुल ठाकूरला साथीला घेत संघाला विजयाच्या दिशेने. यादरम्यान संजूने आपल्या कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. शार्दुलने 33 धावांची मोलाची खेळी केली.

मात्र, 38 व्या षटकात लुंगी एन्गिडीने शार्दुल व कुलदीप यादव यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत सामन्यात रंगत वाढवली. अखेरच्या दोन षटकात 37 धावांची गरज असताना रबाडाने केवळ 7 धावा देत सामना दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने नेला. संजू सॅमसनने अखेरच्या षटकात 20 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तो 86 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडीने सर्वाधिक तीन तर रबाडाने दोन बळी मिळवले.