
कणकवली : एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो स्पर्धा व एका यूट्यूब चॅनल मार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यश संपादन केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये एस.एम. हायस्कूलची विद्यार्थिनी शरयू पाटील हिने १४ वर्षांखालील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तिची निवड कोल्हापूर येथे होणाºया विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली. त्याचप्रमाणे एका चॅनल मार्फत इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यार्थ्यांसाठी मोबाईल फोन शाप की वरदान' या आॅनलाइन निबंध स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी वैदेही प्रधान हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाºया शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ.एस. सी.सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ.एस. एन.तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर, मुख्याध्यापक जी.एन. बोडके, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.