सिंधुदुर्ग : 18 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत पिस्तूल प्रकारातील स्पर्धा भोपाळ, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातून खुल्या गटात शैलेश विष्णू सावंत (सावंतवाडी), युथ गटात साहिश दिगंबर तळणकर (दोडामार्ग) व कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर (सावंतवाडी) हे 10 मी. एअर पिस्तूल गटात महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करत आहेत. तर कु. श्रिया अतुल नाखरे (सावंतवाडी) व आंतरराष्ट्रीय नेमबाज अतुल नाखरे (सावंतवाडी) हे गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करतील.
याच कालावधीत त्रिवेंद्रम, केरळ येथे होणाऱ्या रायफल प्रकारातील नेमबाजी स्पर्धेसाठी कु. ओंकार श्रीकृष्ण सावंत (सावंतवाडी) , कु. सानिया सुदेश आंगचेकर (वेंगुर्ला), कु. वैष्णवी गोविंद भांगले (बांदा), कु. शमित श्याम लाखे (सावंतवाडी) यांची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. हे खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला, बांदा, सावंतवाडी येथे सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या सर्व नेमबाजांचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.