
सिंधुदुर्गनगरी : रोटरी क्लब ऑफ सांगली व अक्वेटिक असोसिएशन ऑफ सांगली आयोजित विभागीय स्विमिंग कॉम्पिटिशन 2025 7 सप्टेंबर 2025 ला कै. रामभाऊ भिडे, जलतरण केंद्र, गणेश नगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूंनी सहभाग घेत उत्तमरीत्या जलतरणचे प्रात्यक्षिके दाखवत आपल्या सर्व खेळ प्रकारांमध्ये बक्षीस मिळवली. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या चिपळूण, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा व आता सांगली या सर्व गावांमध्ये झालेल्या प्रत्येक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा करिता बक्षिसे मिळविले हे फार कौतुकास्पद आहे.
ज्यामध्ये शिवांश शिवप्रसाद खोत, या चिमुकल्याने 9 वर्षाखालील मुले या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक, 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रथम क्रमांक, 50 मीटर बटरफ्लाय प्रथम क्रमांक , 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक व 100 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले मध्ये प्रथम क्रमांक मिळवत वैयक्तिक चॅम्पियनशिप सुद्धा पटकाविली.
त्याच बरोबर लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने 9 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक, 50 मीटर बटरफ्लाय प्रथम क्रमांक, 100 मीटर वैयक्तिक मिडले प्रथम क्रमांक, 200 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रथम क्रमांक, 50 मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक व 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तृतीय क्रमांक, मिळवत वैयक्तिक चॅम्पियनशिप सुद्धा पटकाविली.
त्याचबरोबर उत्कर्ष विद्याधर निवतकर या मुलाने 11 वर्षाखालील मुले या वयोगटात 50 मीटर बटरफ्लाय द्वितीय क्रमांक, 50 मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक, 100 मीटर वैयक्तिक मिडले द्वितीय क्रमांक, 200 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रथम क्रमांक 50 मीटर बॅक स्ट्रोक तृतीय क्रमांक पटकाविले.
या सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्ग नगरी येथील जलतरण तलावाचे कंत्राटदार व प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण लाभले ही सर्व स्पर्धक या जलतरण तलावावर अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत. या सर्व स्पर्धकांना नीलिमा अडसूळ सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी, विजय शिंदे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी, राहुल गायकवाड सहाय्यक जिल्हा क्रीडा, अधिकारी, सचिन रणदिवे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी, शितल शिंदे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.