सिंधुदुर्ग जुदो कराटे अकिदो असो. सावंतवाडीची चमकदार कामगिरी

Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:05 PM
views 224  views

सावंतवाडी : सांगली, इस्लामपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे अकिदो असो. सावंतवाडी संस्थेचे 5 स्पर्धकांनी सुवर्ण पदक प्राप्त करून संस्थेचे तसेच सावंतवाडीचे नाव उज्वल केले आहे. हे स्पर्धक मध्यप्रदेश, इंदूर येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असून महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.

कुमारी दुर्गा जाधव, आदिती सावंत, श्लोक चांदेलकर, आबान बेग, ओम परब वरील विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक वसंत जाधव यांनी केले. तसेच राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून निवड झाल्याबद्दल सेन्सोय दिनेश जाधव यांचे ही अभिनंदन केले.