कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घवघवीत यश

चॅम्पियनशिपसह वैयक्तिक प्रकारात 8 सुवर्ण, 6 रजत व एका कांस्य पदकाची कमाई
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 12, 2023 18:50 PM
views 352  views

सिंधुदुर्गनगरी : लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चॅम्पियनशिप चषकासह वैयक्तिक क्रींडा प्रकारात ८ सुवर्ण पदके, ६ रजत पदके व १ कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट व हॉलीबॉल (शुटींग) यामध्ये विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच सिंधुदुर्ग संघाने संचलनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून सर्व स्तरावरून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

ही स्पर्धा  ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी पालघर येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा एकूण २१ क्रीडाप्रकारांचा व एकल गाणे, दुकल गाणे व समुह नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये कोकण विभागातील कोकण भवन, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी व कलाकारांनी सहभाग दर्शविला होता.

            यामध्ये सहभागी सर्व खेळाडू व कलाकारांना डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग व  स्थानिक निधी व लेखा परीक्षाचे सहाय्यक संचालक बाळासाहेब पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.