सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या वतीने ज्युनिअर सॉफ्टबॉल मुले व मुली संघांची निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता सरस्वती विद्यामंदिर, कुडासे, ता. दोडामार्ग येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००५ नंतरची असावी. खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा आणावा व आवश्यक साहित्यासह उपस्थित रहावे. या स्पर्धेतून निवडलेला संघ सोलापूर येथील अक्कलकोट येथे दि. ७ फेब्रुवारी २०२३ ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव अजय शिंदे, मालवण (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे सुरेंद्र सकपाळ व जिल्हा सचिव अजय शिंदे यांनी केले आहे.