
सावंतवाडी : सशस्त्र सेना दिनानिमित ७ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मिनी मेरथॉन स्पर्धा "आमची धाव जिंकण्यासाठी आमचा सलाम सशस्त्र सेनेसाठी अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले संपूर्ण वेळापत्रक अचूक पाळण्याचे प्रयत्न करून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी ६.३० वाजता उपस्थिती नोंदवल्यानंतर अक्षत शोभेच्या फटाक्यांचे २१ तोफांच्या सलामीप्रमाणे आवाज करत व बिगुल वाजवून लष्करी पद्धतीने शहीद वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर, उपस्थित असलेल्या मान्यवर व्यक्तीचे स्वागत करण्यात आले. यानंतर, वातावरण अधिकच देशभक्तीमय बनले. कारण उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायन केले आणि मॅरेथॉनला औपचारिक सुरुवात झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
सर्वप्रथम, १९ वर्षांखालील मुलांच्या गटातील स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेच्या मार्गावर स्वयंसेवकांनी उत्कृष्ट व्यवस्थापन ठेवल्यामुळे स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली. 11 वर्षाखालील मुलगे आणि मुली, 15 वर्षाखालील मुलगे आणि मुली आणि 18 वर्षाखालील मुलगे आणि मुली अश्या 6 गटात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सशस्त्रसेना दिनाचे संदेश देणाऱ्या घोषणाच्या माध्यमातून देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मेरथोन मार्गावर पोलीस विभाग, आरोग्य विभाग, स्वयंसेवक व आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे तैनात करून सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. धावपटूंना पाणी, प्राथमिक उपचार व दिशादर्शक चिन्हांची सोय उत्तमप्रकारे उपलब्ध करण्यात होती. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिद्दीने, वेगाने व क्रीडास्पूर्तीने उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. अनेक पालक, नागरिक आणि पर्यटकांनीही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धावपटूंना प्रोत्साहन दिले. ०९:०० वाजता सर्व गटांतील विजेत्यांनी अंतिम टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. स्पर्धकांचा प्रचंड उत्साह आणि चुरस बघून त्यांना प्रोत्साहन म्हणून आयोजकांनी आयत्या वेळी अजून दोन क्रमांकाना गौरविण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे 5 ऐवजी 7 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे लेफ्ट. कर्नल, रत्नेश सिन्हा यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 18 वर्षाखालील मुले- प्रथम प्रशांत नारायण सुद्रिक, द्वितीय निखिल पवन राणे तृतीय- यश आप्पा परब, चौथा स्वराज स्वप्नील सुर्वे, पाचचा स्वागत दिनेश नाईक, सहावा विराज रविंद्र गावडे, सातवा - निखिल राजाराम सावंत. 18 वर्षाखालील मुली- प्रथम मेघा प्रमोद सातपुते, द्वितीय समीक्षा जानु वरक तृतीय वैष्णवी आत्माराम सावंत, चौथा कोमल सचिन नाईक, पाचवा वंदना श्रीकांत कोकरे, सहावा श्रद्धा सुनील रुपये, सालवा- प्रेक्षा पुरुषोत्तम सावंत.
15 वर्षाखालील मुले प्रथम आशिर्वाद प्रमोद सातपुते, द्वितीय हर्ष रविंद्र गोसावीतृतीय भावेश संतोष यादव, चौथा यश प्रकाश कडव, पाचवा राकेश रामचंद्र शेट, सहावा- सुशोभन संदीप सावंत, सातवा करण आनंद गवळी.
15 वर्षाखालील मुली प्रथम महिमा विशाल मोहिते, द्वितीय आस्था अमित लिंगवत तृतीय-आकांक्षा दीपक कुंभार, चौथा मैथिली सचिन गावडे, पाचवा मनस्वी रामचंद्र पांगे, सहावा शालीन गुरुनाथ दळवी, सातवा सौम्या दत्ताराम मेखी.
11 वर्षाखालील मुले प्रथम ओम मदन शिरोडकर, संदीप सावंत, चौथा शयान नासिर शेख, पाचवा वरक, सातवा आराध्य नागेश कर्पे, द्वितीय यजेश योगेश दळवी तृतीय- स्वराज यश यल्लाप्पा झपाटे, सहावा वेदान्त जानू
11 वर्षाखालील मुली- प्रथम अनुज्ञा दीपक कुंभार, द्वितीय हिंदवी जयराम दळवी तृतीय अन्वी सुरेश सिनाळकर, चौथा मंजूषा यशवंत कविटकर, पाचवा स्वरा सचिन चव्हाण, सहावा लाजरी भालचंद्र चिंचकर, सातवा पूर्वा ज्योतीराम गुरव.
बाल स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग बघून आयत्या वेळी 6 वर्षाखालील मुलांची वेगळी व्यवस्था करून स्पर्धा घ्यावी लागली हे या स्पर्धेचे यश म्हणावे लागेल. त्यांना प्रोत्साहन देण्या साठी या सर्वच बलचमुला मेडल दिल्यामुळे बच्चेमंडळी हरखून गेली होती.
या जिल्हास्तरीय मिनी मॅरथॉनमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जाणीव वाढवण्याबरोबरच सशख दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. या स्पर्धेचे अधोरेखित करण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमपत्रिकेमध्ये सांगितलेल्या पद्धतीनेच वेळेचे नियोजन. यावेळी बोलताना, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष श्री. विष्णु ताम्हाणेकर म्हणाले की, "सशस्त्र सेना दिनानिमित आयोजित या मॅरेथॉनचा उद्देश केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे हा नसून, आपल्या शूर सैनिकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या शौर्याची आठवण करणे हा आहे. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील स्पर्धकांचा उत्साह पाहून आम्ही भारावून गेलो आहोत."
सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत सैनिक संघटनेची कार्यकारिणी, शिवम असोशिएटचे गोल्ड लीडर माजी कंप्टन कृष्ण गवस, गोल्ड लीडर माजी सुभेदार दीपक शिर्के, शिवम असोशिएटचे रोयल टीम श्री, तुकाराम गावडे श्री, अजित सावंत, मास्टर ट्रेवल्सचे अब्दुल्ला शरीफ सय्यद, विश्रांति हॉटेलचे राजेश नारवेकर, द ध्येय करीअर अकॅडेमीचे एकनाथ सालकर, बजाज लाइफ इन्शुरेसच्या श्रीम स्नेहा कुबल, आरेकर तन्मय फेमिली रेस्टोरंटचे श्री, निलेश आरेकर, एक्स्पर्टी बेकरीचे श्री. योगेश, सिंधुदुर्ग जिहला सेवा निवृत्त सैनिक संघटनेच्या महिला भगिनी तसेच माजी सैनिक आणि काही जागरुक व सैनिकांप्रति कृतज्ञ नागरिकानी आर्थिक हातभार लावला. संपूर्ण कार्यक्रम वेळेवर आणि उत्साहात पार पडल्याबद्दल उपस्थितांनी सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी पुढील वर्षी ही स्पर्धा अशीच उत्साहात शिस्तबद्ध प्रकारे अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करावी अश्या सूचना येत होत्या.














