
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गची कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडियामध्ये दुसऱ्या दिवशी आणखी एक मेडल पटकावत महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला आहे. तिने दमन-दिव येथे सुरु असलेल्या 5 किलोमीटर अंतर सागरी जलतरणस्पर्धेत 1 तास 13 मिनटात पार करत दुसरा क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले आहे.
काल बुधवारी 21 रोजी तीने पहिल्या दिवशी 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकावले होते. आज पुन्हा आणखी एका पदकाची कमाई केली आहे. यासाठी तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून पूर्वांचे सहायक जलतरण क्रीडा प्रशिक्षक विशाल नरावडे, सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस ह्या खास दिव येथे उपस्थित राहून अभिनंदन केले आहे.