सावंतवाडी : निरवडे महापुरुष कला - क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचा मानकरी तळवडे येथील 'सिद्धेश्वर म्हाळाईदेवी' संघ ठरला. तर वेत्ये येथील कलेश्वर या संघाने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारच्या स्पर्धा जास्तीत जास्त आयोजित करून तरुणाईने मैदानी खेळावर भर द्यावा, त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य आपण करू, असे आश्वासन यावेळी रुपेश राऊळ यांनी दिले.
यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत, पोलीस हवालदार श्री नाईक, निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे आदी पदाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.