सिंधुदुर्ग : स्पोर्टस् फाउंडेशन सिंधुदुर्ग, किर्लोस व सिंधुदुर्ग जिल्हा अम्यूचेअर अॅथलेटीक्स् असोसिएशन यांच्या सलग्नतेनी आयोजित जिल्हा्स्तरीय आंतरशालेय व ज्युनियर कॉलेज अॅथलेटीक्स् चॅम्पियनशिप स्पर्धा त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये शेठ. न. म. विद्यालय, खारेपाटण या शाळेतील कुमार साहिल सुनिल शेंगाळे याने १४ वर्षा खालील मुलांच्या गटात लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक तसेच गोळा फेक मध्ये सुवर्णपदक मिळवले आणि १०० मीटर धावणे मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तसेच कुमारी माधवी सुनिल शेंगाळे हीने १०० मीटर धावणे २०० मीटर धावणे व तसेच लांब उडीमध्ये सुवर्ण पदक मिळवले. त्याचप्रमाणे वैयक्तिक विजेतेपद चषक मिळवला.
या क्रीडा स्पर्धमध्ये बाळकृष्ण अनाजी कदम, अध्यक्ष, संपादक व आयोजक यांनी स्पर्धा आयोजनास लाखमोलाचे आम्हाला सहकार्य केले . या स्पर्धेेकरिता मार्गदर्शक समीर जयवंत राऊत, सह.सचिव सिंधदुर्ग जिल्हा अॅमेच्युअर अॅथलेटीक्स् असोसिएशन श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अॅकॅडमी ,निरोम चे संस्थापक व अध्यक्ष तसेच महिला तालुका मार्गदर्शन, कु.अंजली जयसिंग गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप, क्रीडा शिक्षक पाडवी तसेच माझी आई सौ. सुप्रिया सुनिल शेंगाळे व वडील मा. सुनिल शेंगाळे यांच्या प्रोत्साहनामुळे आज त्यांनी यश संपादन केले.