शुबमन गिलचा भीम पराक्रम! ; द्विशतक झळकावणारा जगातील सर्वात युवा फलंदाज !

द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 18, 2023 18:05 PM
views 320  views

हैद्राबाद : येथे भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला.

शुबमन गिलने १४९ चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याचबरोबर तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे हे पाच भारतीय खेळाडू –

सचिन तेंडुलकर २०० नाबाद वि. दक्षिण आफ्रिका २०१०

वीरेंद्र सेहवाग २१९ वि. वेस्ट इंडीज २०११

रोहित शर्मा २०९ वि. ऑस्ट्रेलिया २०१३

रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका २०१४

रोहित शर्मा २०८ नाबाद वि. श्रीलंका २०१७

ईशान किशन २१० वि. बांगलादेश २०२२

शुभमन गिल २०८ वि. न्यूझीलंड २०२३