
देवगड : वाडा येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम पटकावला आहे. तर १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
ओरोस येथे संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता १७ वर्षाखालील मुलींच्या संघाची निवड झाली आहे. यशस्वी संघाला प्रशालेचे क्रीडा शिक्षक मृत्युंजय मुणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे, सचिव -प्रवीण जोग, क्रीडा समिती अध्यक्ष- प्रशांत वारीक, शाला समिती अध्यक्ष - प्रसाद मोंडकर, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.