
दोडामार्ग : करुणा सदन स्कूल, साटेली भेडशीची विद्यार्थिनी कु. श्रेया सुहास देसाई (रा- पाल पुनवर्सन) हिने नुकत्याच झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक आणि दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात कराटे या क्रीडा प्रकारात श्रेया देसाई हिने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे व दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. तिचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
यशामध्ये मोलाचे मार्गदर्शन
श्रेयाच्या या महान यशात कराटे प्रशिक्षक बाळकृष्ण कर्पे, क्रीडा शिक्षक प्रवीण केसरकर आणि करुणा सदन स्कूलच्या प्रिन्सिपल शबीना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक प्रयत्नातून श्रेयाने विभागीय स्पर्धेतील आव्हान यशस्वीपणे पार पाडले.
पुढील स्पर्धेसाठी निवड
या दैदीप्यमान कामगिरीमुळे श्रेया देसाई हिची आता पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल करुणा सदन स्कूलच्या प्रिन्सिपल यांनी तिचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील स्पर्धेसाठी सर्व स्तरांतून तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत.
 
 
    
                    
   


 
 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



 
 
               









 
       
       
       
       
      